Skip to content

The childhood – विचार केला असाच एकदा…

May 2, 2010

मी तसा कवी नाही. पण आज अचानक बालपण आठवले अन् लिहायची इच्छा झाली…

विचार केला असाच एकदा,
पुन्हा परतले जर ते बालपण,
मुक्त होऊन जाईल हे मन,
करेन खोड्या पुन्हा एकदा,
विचार केला असाच एकदा…

पुन्हा परतले जर ते बालपण,
आनंद होईल स्वैर बागडण्याचा,
मोह होईल (दात कीडवणारे) चॉक्लेट्स खाण्याचा,
जे बाबा देती लपुन अनेकदा,
विचार केला असाच एकदा…

पुन्हा परतले जर ते बालपण,
होईल अभ्यास पुन्हा नकोसा,
अन् टि.व्ही. होईल हवा हवासा,
पण कंटाळवाणा अभ्यास जर नाही केला,
तर आई ‘धपाटा’ देईल पुन्हा एकदा,
विचार केला असाच एकदा…

पुन्हा परतले जर ते बालपण,
पुन्हा आजोबांशी खेळेन कुस्ती,
थकेपर्यंत करेन दंगामस्ती,
बालपणाने रमलेला तो दिवस गेल्यावर,
आईच्या कुशीत झोपेन पुन्हा एकदा,
विचार केला असाच एकदा…

– रोहन

Share

Advertisements

From → Life, Poetry

3 Comments
 1. खूप छान कविता आहे सर!! Keep Writing 🙂

  Best Regards,
  Parminder Kaur

  • धन्यवाद! तुमची मराठी पण खुप छान आहे… 🙂

 2. rutuja permalink

  Apratim!!!
  keep it up!
  🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: