Skip to content

तिच्यावर लिहिलेली माझी पहिली-वहिली कविता..

May 21, 2011

म्हणतात ना, “प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सारखंच असतं” वगैरे..

मी रोजसारखाच आपल्या ठराविक मित्राबरोबर चहा घ्यायला ऑफिस च्या कॅन्टीन मध्ये येतो.. आणि अचानक ‘ती’ दिसते.. अगदी पहिल्यांदाच तिला बघितल्यावर नकळत माझ्यावर पडलेली तिची ती नजर अंगावर शहारे आणणारी असते.. एरवी आपण ज्या मुलींना ‘eye tonic’ म्हणून बघतो, त्यातली ती नसतेच! इतक्या hi-tech कंपनी मध्ये तिचे ते बोलके डोळे आणि साधा पेहराव हे तिला इतर मुलींपासून वेगळं करतात.

आणि मग नेहमीच मला ती दिसायला लागते, कधी एकटा असताना ती जवळ असल्याचा भास होतो.. ती नेहमीच सोबत असावीशी वाटते.. मी मारलेल्या एखाद्या ‘पांचट’ अशा joke वरही हसाविशी वाटते.. आणि मग रात्री जेव्हा लवकर झोप येत नाही.. तेव्हा मी तिच्यावर माझी पहिली कविता लिहितो..

दूर आहेस जरी माझ्याहून
वाटतं एकटं ग तुझ्याविना
गप्पा करायला माझ्याशी
माझ्या स्वप्नात येशील???

आव्हानांच शिखर आहे पुढे
विश्वास आहे स्वतःवर मला
फक्त पाहिलं पाउल टाकताना
तुझा हात देशील???

सूर्य तर हा रोजच उगवतो
त्याची वेळ झाल्यावर तोही मावळतो
अंधारात घरची वाट शोधताना
माझे डोळे होशील???

सर्वांसमवेत असतानाही
विचार तुझाच करतो ग
एक सुखद धक्का देण्यासाठी
माझ्या समोर येशील???

एकांतात विचार करताना
मनात माझ्या ह्या वेड्या
चित्र रेखाटलं जातं तुझं
त्यात रंग भरशील???

दूर आहेस जरी माझ्याहून
वाटतं एकटं ग तुझ्याविना
गप्पा करायला माझ्याशी
माझ्या स्वप्नात येशील???

-रोहन फाये, पुणे

Share

From → Favorites, Poetry

3 Comments
  1. Hi Rohan,
    I ran across your blog and i liked it.I am developing my blog on wordpress.com in Marathi. but unable to download Marathi font. Can you please tell me which font you have used for your blog. and how i can download it to develop blog in marathi.

    Regards,
    Ashsih

  2. Santosh Thakre from buldana permalink

    khupch chan kavita ahe ,ani khari ahe

  3. khupch chan kavita ahe

Leave a comment